शैलजा एकटी बसली असता....... तिच्या मनात विचार आले......? ते विचार होते....... तिने बघितलेल्या एका छोट्या पण, तितक्याच महत्वाच्या स्वप्ना बद्दल...... जे की, अजूनही पूर्ण झालेले नव्हते.....? जरी, ते स्वप्न लहान असले..... तरी, तिला ते पूर्ण झाले तरच, आपले जीवन सार्थक होईल असेच वाटत होते.....? पण, कुटुंबाच्या जबाबदारीतून ती कधीच सुटू शकली नव्हती...... तिचं संयुक्त कुटुंब...... सासू - सासरे, दिर - भासरे, जावा, पुतणे....... त्यामुळे, तिला स्वतःविषयी विचार करण्याचा वेळ मिळालाच नाही....... किंवा अस म्हणा ना तिने, त्याबाबतीत कधी विचारच केला नाही........ कारणही तेच..... माहेरून तिला सांगण्यात आले की, आता तुझं सासर हेच, तुझं घर असेल आणि त्यांना खुश करणं हेच