१८) सौभाग्य व ती! अमरावतीला भाऊंकडे येवून नयनला सात महिने झाले होते. सात महिन्यांमधला एकही दिवस असा गेला नसेल ज्या दिवशी नयनला विठाबाईची आठवण झाली नसेल. त्याचे कारण म्हणजे आई-भाऊंचा अबोला! ते प्रत्यक्षात काही बोलत नसले तरी त्यांचा अबोला बरेच काही सांगत होता. आईचा तसा प्रत्यक्ष अबोला नसला तरी बोलताना आपलेपणा, उत्साहही नसायचा. तिच्या बोलण्यातून कधी कीव, कधी घृणा जाणवत असे. भाऊंनी दोन-तीन वेळा व्यावहारीक बोलणी तीही दोन-तीन शब्दात केली असेल... सदाच्या संबंधात! त्याच्याविरुद्ध कोर्टात पोटगीची केस