गोट्या - भाग ४

  • 8.2k
  • 2.5k

नशीबबारावीची परीक्षा देऊन गोट्या आपल्या गावी परत आला होता. त्याला लहानपणीचे सारे खेळ आठवत होते मात्र त्याला ते खेळ खेळण्यात आता लाज वाटत होते. सकाळचे जेवण संपवून तो पलंगावर आराम करत होता. त्याला त्याचा भूतकाळ आठवू लागला. दहाव्या वर्गात शिकताना गोट्याला एका अनोख्या संकटाला।तोंड द्यावे लागले होते. दहावीचा वर्ष म्हणून त्याचा जोमाने अभ्यास चालू होता. गोट्या शरीराने जरा हाडकुळा होता. त्यामुळे बघणाऱ्याला हा आजारी आहे की काय ? अशी शंका मनात येत असे. तसा तो भित्रा देखील होता. कोणत्याही गुरुजींचे मार पडू नये म्हणून तो गृहपाठ आणि दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करत असे. कधी कोणत्याही शिक्षकांची गोट्या विषयी अजिबात तक्रार