लेडीज ओन्ली - 7

  • 5.8k
  • 2.1k

|| लेडीज ओन्ली ||(भाग - 7 ) विजयाताई आज सकाळी लवकरच उठल्या. प्रदेशाध्यक्षांनी उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी पक्ष कार्यालयात बोलावलं होतं. सकाळची सगळी कामं त्यांनी पटापट आवरली. राधाबाईही आल्या होत्या. पण त्यांच्याशी गप्पा मारायला आज वेळच नव्हता. विजयाताईंमागे काहीतरी महत्वाचं काम आहे हे राधाबाईंनी ओळखलं. त्याही लगबगीने हात उचलू लागल्या. इतक्यात कुणीतरी दार ठोठावलं. राधाबाई भांडी घासत होत्या. विजयाताईंनी दार उघडलं. अन् दारात... त्यांचा जीव, त्यांचा प्राण, त्यांचा श्वास, त्यांच जीवन, त्यांचं लेकरू... अश्रवी. विजयाताई काही वेळ भान हरपून दारात उभ्या असलेल्या आपल्या लेकराकडे बघतच राहिल्या. अश्रवीही हसऱ्या ओल्या डोळ्यांनी आईकडे बघत राहिली. दोघींचेही डोळे