गुंतता हृदय हे !! (भाग ४)

(14)
  • 8.6k
  • 3.8k

आर्या हसत हसतच समीर जवळ आली.. इतक्यात तिला आठवले की, समीरला तिला काहीतरी सांगायचे होते.. ती लगेच म्हणाली, "अरे समीर तू काहीतरी सांगणार होतास. बोल काय बोलायचंय." तो बोलणारच होता की, आर्याच्या फोनची मेसेज टोन वाजली..तिने पाहिले तर अनिशचा मेसेज होता. त्याने तिला भेटायची वेळ आणि ठिकाणाचे नाव मेसेज केले होते.. त्याने भेटायची वेळ ५ वाजताची दिली होती. आर्याने घड्याळाकडे बघितले तर ३ वाजत होते..म्हणजे आर्याकडे फक्त २ तासच होते..तयार व्हायला.. ती लगेच शेखरजवळ गेली व तिने शेखरला विनंती केली की, तिला एका महत्वाच्या कामामुळे आताच घरी जावे लागणार म्हणून..शेखरने एकवार समीरकडे पाहिले..तर समीरने मान हलवून हो असा इशारा केला..मग