तुझाच मी अन माझीच तू...भाग १६

(15)
  • 13.4k
  • 6.7k

तुझाच मी अन माझीच तू...भाग १६ राजस अमेय ला भेटून आल्यापासून एकदमच फ्रेश झाला.. आता तो मोकळा झाल होता आणि पूर्णपणे नाही पण आभाच्या विचारातून बाहेर येण्यास तो यशस्वी होत होता. तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि त्याला छान वाटत होते.. त्याने पटापट आवरले आणि तो ब्रेकफास्ट करण्यासाठी बाहेर आला.. त्याचे आई बाबा त्याचीच वाट पाहत होते. "काय आहे आज आई?" "सँडविच केलंय.. सॉरी रे.. काल अचानक बाहेर जाव लागल आणि तुला खायला सुद्धा काहीच नव्हता.." "वॉव!! भरपूर चीज घातलं आहेस न.. आणि ठीके ग आई.. तुम्हाला पण तुमच आयुष्य आहेच.. माझ्यासाठी तुम्ही किती अडकणार..." राजस