सौभाग्य व ती! - 19

  • 6.9k
  • 2.9k

१९) सौभाग्य व ती! त्यादिवशी सकाळी नयन शाळेत जाण्याची तयारी करत असताना बाहेरून आलेले भाऊ आईला घाबऱ्या स्वरात म्हणाले, "अग...अग...चल..." भाऊचा तसा घाबरा आवाज, अवतार बघून घाबरलेल्या आईने विचारले, "क...काय झाले हो?" "अग, कमाचा नवरा सिरीयस आहे. मी येतानाच अण्णा, मंगल, शोभा, साधनाला सांगून आलो. चल लवकर..." "शिव...शिव...शंकरा, हे काय आरिष्ट आणल रे बाबा, कृपा असू दे रे बाबा..." असे म्हणत म्हणत आईने जाण्याची तयारी सुरू केली. काही क्षणातच नयनच्या आत्या मंगल, शोभा, साधना, अण्णा, काकी, तिन्ही