मुलगी होणं सोपं नाही - 1

(11)
  • 9.7k
  • 2
  • 4.2k

भाग एक- मुलीचा जन्म.... नर्मदा काकुचे नुकतेच लग्न झाले होते. लग्न होऊन एक वर्ष सुद्धा पुर्ण झाले नव्हते आणि लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांनीच त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. नर्मदा काकु आई होणार म्हणुन सर्वच खुश होते, माझी आईही खुशच होती. पण ती खुश आहे, हे आमच्याच घरातल्या महिलांना बघवत नव्हते. आजी आईला सारखे टोमणे देत राहायची कारण लग्नाला तीन वर्षे व्हायला आले, तरीही आईला बाळ झाले नव्हते. मग आजी आईला उठता बसता नर्मदा काकुंबद्दल सांगायची. आजीची जाऊबाई म्हणजेच नर्मदा काकुंची सासु त्या सतत माझ्या आजीसमोर आईला नावे ठेवायच्या आणि बाबांचे दुसरे लग्न करण्यासाठी सल्ले देत होत्या. त्यांचे ऐकुन आजी