(नमस्कार वाचक मित्रांनो! हि माझी पहिलीच कथा आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहे. कोणत्याही धर्माच्या रूढी, परंपरा इ. तसेच कोणाच्याही सामाजिक चालीरितींचा अपमान किंवा टीका करणे हा माझा हेतू नाही. हि कथा केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे त्याच्या आपण सर्वानी आनंद घ्यावा. कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.) प्रस्तावना मला लहानपणा पासूनच भूतांच्या गोष्टी खूप आवडतात. मी आजपर्यंत भूतांच्या खूप गोष्टी वाचल्या आहेत. या गोष्टींमध्ये जास्त करून भूते हि भयानक आणि अतृप्त असतात असेच माझ्या वाचनात आले आहे. त्याच बरोबर या भूतांकडे अचाट राक्षसी, जादुई शक्ती असतात, भूतांमधील वेगवेगळे प्रकार हि माझ्या वाचनात आले आहेत. पण माझ्या मनातील काही प्रश्नांची