गुंतता हृदय हे !! (भाग ५)

  • 8.6k
  • 1
  • 3.6k

ती तिच्या डेस्कजवळ गेली आणि तिने तिथे पर्स ठेवली. तेवढ्यात तिचं लक्ष समीरच्या डेस्क कडे गेलं..पण तिथे कुणीच नव्हतं.. म्हणजे समीर अजून ऑफिसला आला नव्हता.. कॉफी पिण्यासाठी आर्या कॅन्टीनमध्ये जाणार इतक्यात समीर आला.. अचानक आलेल्या पावसाच्या सरीमुळे त्याचे केस थोडेफार भिजले होते.. तो आज रोजच्यापेक्षा खूपच handsome दिसत होता.. आर्या ही एक क्षण त्याच्याकडे बघतच राहिली.. अचानक समीरने "गुड मॉर्निंग आर्या" अशी हाक मारल्यावर ती भानावर आली.. तिला काय बोलावे हेच सुचत नव्हते..तिने फक्त हाताने कॅन्टीनकडे खूण केली.. समीर पण त्याची बॅग ठेवून कॅन्टीनमध्ये आला..मग दोघांनीही कॉफी घेतली. तेवढ्यात आर्या पटकन म्हणाली, "समीर, तुला काल मला काहीतरी सांगायचं होतं ना?,