अनेक तत्ववेत्ते यांचा वावर आमच्या जीवनात आजही आहे.मनाचा वावर सर्वत्र असतो. मुळात मन हे इतके चंचल आहे की ,मनात येणाऱ्या गोष्टी ही तितक्याच चंचल असतात.आपल्या मनाला संभ्रम पडतो की, आपला व मनाचा वावर नेमका कुठे आहे? मन एकीकडे आहे वाटत असतानांच, कधी दुसरीकडे जातं, समजत नाही. झटक्यात मनाच्या हिंदोळ्याचा वावर इकडून तिकडे झुलत असतो. यात कोणाचा वावर कुणीकडे हेच कळत नाही. एकाच वेळेस आपण असंख्य गोष्टी करतो. मनाचा वावर शरीरातही असतो शरीरा बाहेरही असतो. माणूस प्रेमाचं नाटक करता करता, त्याचा वावर अचानक वासनेच्या प्रांतात कधी होतो हे त्यालाही कळत नाही. माणसातला राक्षस जागा कधी होईल सांगता येत नाही. मनाचा वावरच असा