गुंतता हृदय हे!! (भाग ६)

  • 8.4k
  • 3.6k

नेहमीप्रमाणे तिने घराची डोअरबेल वाजवली..आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला कारण दरवाजा चक्क अनिशने उघडला होता..त्याला पाहून ती खूपच खुश झाली..आत जाऊन बघते तर.... अनिशचे आई बाबा सुद्धा आले होते व ते आर्याच्या आई-बाबांबरोबर गप्पा मारत चहा पित होते.. आर्याच्या आईने भजी पण केली होती..त्याचाही सगळे आस्वाद घेत होते.. आर्याला काहीच कळत नव्हते..नक्की काय चाललंय ते.. आर्याने खुणेने अनिशला विचारले. पण तो काहीच बोलला नाही..तेवढयात सगळ्यांची नजर आर्यावर गेली.. आर्या बऱ्यापैकी भिजली होती.. ती सगळ्यांना बघून म्हणाली, "मी पटकन फ्रेश होऊन येते" थोड्याचवेळात आर्या फ्रेश होऊन आली. तेव्हा अनिशच्या आईने म्हणजेच गोडबोले काकूंनी तिला जवळ बोलाविले आणि म्हणाल्या, "आर्या बेटा, मला