विभाजन - 13

  • 5.3k
  • 2.4k

विभाजन (कादंबरी) (13) युसूफ नेता बनला खरा. त्याचं जीवन सुखी झालं खरं. पण त्याच्याहीसमोर प्रश्न होता. तो म्हणजे नेहमीनेहमी या देशावर होणा-या पाकिस्तानच्या सतत आक्रमणाचा, पाकिस्तान नेहमी नेहमी या भारतावर गोळीबार करीत होता. भारताला मिटविण्याच्या धमक्याही देत होता. कधी परमाणू बाँब टाकू असंही बोलत होता. युसूफ देशाचा नेता असला तरी या पाकिस्तानच्या अशा वागण्यानं परेशान होता. देशात ठिकठिकाणी बाँबस्फोट होत असत. त्याचे सुत्रधार हे पाकश्रेत्रात लपून बसत असत. ते सुत्रधार स्वतः त्याची कबूली देत असत. पण पाकिस्तान सरकार नेहमी खोटं बोलत असे. ते नेहमी म्हणत असे की आम्ही कुणालाही लपवलेलं नाही. अशाप्रकारचं खोटं बोलणं, त्यातच पाकिस्तानचं असं वागणं ही गोष्ट