तो सहवास - (भाग_२)

  • 5.4k
  • 2k

मी असाच विचार करत होते . तेवढ्यात बाबा जवळ आले आणि त्यांनी मला विचारला मुलगा आवडला ना तुला?मी जरा लाजले आणि खाली मान घालून हो म्हणाले पण मी लगेच बाबा ला विचारले बाबा लग्न १२वी झाल्यानंतर झाला तर? बाबा नी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले हो चालेल पण एकदा त्या पाहुण्यांना ही विचारतो ते की म्हणतेत चालेल ना तुला ?मी हो म्हणाले कारण माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता.पण ताई म्हणाली होती की मुलगा प्राध्यापक आहे डी. ई ड कॉलेज ला म्हणजे शिक्षणाचा महत्त्व त्यांना समजेल च आणि मला ते पुढचा शिक्षण घेवू देतील.असेच सहामाही परीक्षा संपली आणि मला सुट्ट्या लागल्या १० दिवस