मी ती आणि शिमला - 2

  • 12k
  • 5.9k

प्रवास खूप लांबचा होता केतन आणि मानसी मागे बसलेले तर स्वराली माझ्या बाजूच्या सीटवर. गाणी वाजत होती गप्पा आणि मस्ती चालू होती आणि मध्ये मध्ये महेश ला शिव्या घालन सुद्धा. आम्ही पहिला ब्रेक घेतला तो वलसाड ला सकाळचे ११ वाजत होते आणि बसून बसून सर्वच जण आत्ता वैतागले होते. नाश्ता वगैर केला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.आत्ता गाडी केतन ने घेतली आणि मी केतनच्या जागी बसलो. परत गप्पा गाणी मध्येच थांबून फोटो शूट वगैर चालू होत केतन आणि मानसी एन्जॉय करत होते पण मी आणि स्वरा असे गप्प होतो जसे म्युट असल्या सारखे. आत्ता बरच वेळ झाला होता दुपार चे