सौभाग्य व ती! - 22

  • 6.4k
  • 2.6k

२२) सौभाग्य व ती! "ताईसाहेब..." आत येत भाई म्हणाला. "काय भाईजी?" नयनने विचारले. "चेअरमन साहेब..." भाईजी म्हणत असताना खांडरे आत आल्याचे पाहून नयनने उठून त्यांचे स्वागत केले. खुर्चीत बसत साहेब म्हणाले, "काय म्हणते शाळा आणि आपले शिक्षक? पगाराबाबत कुरकुरत असतील..." "नाही. तसं काही नाही..." "ताई, आम्हाला माहिती आहे तुम्ही नाहीच म्हणणार पण तुम्हाला होणारा त्रास आम्ही जाणून आहोत. या महिन्यापासून सर्वांना... अगदी भाईजी तुम्हालाही पन्नास रूपये पगारवाढ करत आहोत. काही दिवसातच दोन खोल्याचे बांधकामही सुरू करत आहोत. क्या भाईजी,