विभाजन (कादंबरी) (14) तो काळ १९९२ ते १९९७ चा होता. त्या काळातच युसूफ खासदार म्हणून निवडून गेला होता. पहिल्या वेळी जेव्हा संसद भवनात अधिवेशन भरलं. त्यात युसूफलाही बाजू मांडायला लावली. तेव्हा त्यानं जनसंख्या वृद्धीवर जोरदार भाषण केलं आणि हेही सांगीतलं की जर याचवेळी जनसंख्येवर नियंत्रण आणलं गेलं नाही. तर उद्या लोकसंख्येचा विस्फोट आपल्या देशात झाल्याशिवाय राहणार नाही. युसूफचं भाषण संपलं. तशा जोरदार टाळ्या संसदभवनात वाजल्या. युसूफचं बोलणं सर्वांना पटलं होतं. त्यातच लोकसंख्या नियंत्रणाचा युसूफचा मुद्दा सर्वांना पटला. त्यांनी ह्याच मुद्दयाचा गांभीर्यानं विचार करुन पुढे ज्या पंचवार्षीक योजनेची कलमं तयार केली. त्या कलमात जनसंख्या वृद्धी नियंत्रणावर जोर देवून लोकसंख्या नियंत्रण कायदा