सौभाग्य व ती! - 23

(13)
  • 5.9k
  • 2.4k

२३) सौभाग्य व ती! कार्यालयात बसलेल्या नयनपुढे भाईने चार पत्रे आणून ठेवली. त्यातील एका पत्रावरील पत्ता पाहताच तिचा चेहरा आनंदला. टप्पोरं, मोत्यागत अक्षर असलेलं ते पत्र संजीवनीचं होतं. सुरुवातीपासून संजीवनीचे अक्षर अत्यंत सुंदर, वळणदार होते. बाकीची पत्रं बाजूला करून नयनने संजीवनीचे पत्र उघडले. संजीवनीने सुंदर, वळणदार अक्षरात लिहिले होते... 'आई, आज सकाळीच तुझे आणि माधोचे पत्र मिळाले. मामींच्या त्रासामुळे तुम्ही घर सोडलत हे समजल. राहून राहून मला एक प्रश्न पडतो की तुझ्याच मागे नशीब का हात धुवून लागलेय? किती वर्षे