विभाजन - 16

  • 5.6k
  • 2.3k

विभाजन (कादंबरी) (16) आम्ही भारतीय आहो असं मानत आणि म्हणत आम्ही देशात राहतो. काश्मीरला आम्ही आमच्या देशाची शान समजतो. नव्हे तर त्या काश्मीरला आम्ही आमच्या नकाशातही दाखवतो. तसेच त्या ठिकाणी असलेल्या अमरनाथ गुफेत प्रकट होणा-या शिवलिंगाचे अर्थात बर्फानी बाबाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हिंदू भावीक जातात. नव्हे तर त्या ठिकाणी लावलेल्या दुकानातील माल घेवून त्या काश्मीरच्या लोकांना जगवतो. तिथे सेना ठेवून त्या सेनेच्या मदतीने पाकिस्तानात दडलेल्या आतंकवाद्याकडून आम्ही त्या काश्मीरच्या लोकांची सुरक्षा करतो. बदल्यात आम्हाला काय मिळतं? काश्मीर ही घाटी आहे. अत्यंत बर्फाच्छादीत प्रदेश. उन्हाळ्यातच काही दिवस थोडं गरमपणा. बाकी वर्षभर थंड वातावरण. तेवढंच रमणीयही. याच काश्मीरला भारताचा स्वर्गही म्हणतात. अशा