तिच्यावर होणारे अत्याचार कधी थांबणार..?

  • 11.4k
  • 3.6k

आज दिनांक २९ सप्टेंबर २०२०, रात्रीचे सुमारे १२.३० वाजले होते. माझी आई आणि बहीण दोघीही बेडरूममध्ये झोपल्या होत्या. मी आणि माझा भाऊ हॉलमध्ये अजूनही जागेच होतो. भाऊ मोबाईलमध्ये मूवी बघत होता तर मी नेहमीप्रमाणे लॅपटॉपमध्ये माझं काम करत बसली होती. तितक्यात बहिणीच्या मोबाईलची रिंग वाजली. एवढ्या रात्री कोणाचा कॉल आला असेल या भीतीने माझी आईसुद्धा घाबरून उठली. नंबर अनोळखी असल्यामुळे कॉल उचलायचा कि नाही हा प्रश्न पडला होता. परंतु कोणीतरी महत्वाचं काम असेल म्हणून कॉल केला असेल असा विचार करून माझ्या आईने बहिणीला कॉल उचलायला लावला. कॉल उचलताच समोरून आवाज आला, "वर्षा मॅम, मैं विहान कीं माँ बात कर राही