मुलगी होणं सोपं नाही - 3 - शिक्षणासाठी धडपड

  • 5.4k
  • 1
  • 2.3k

आज आजी.. कामाचा पहिला दिवस असल्यामुळे लवकर घरी आली होती. आजची संध्याकाळ जणु आजी आणि नातींसाठीच होती. रात्रीचे जेवण ही आजी आणि ताईने चमचमीतच बनवले होते. मला मात्र माई तिच्या हाताने भरवत होती. मामालाही चमचमीत जेवण खुप आवडले. आई, 'आज जेवणाचा बेत भारी चमचमीत आखला आहेस बघ,... मी तर तुझ्या हातचं असं जेवण खुप दिवसांनी जेवतोय'. मामा, रुमालाला हात पुसतच म्हणाला.. 'हो रे, आज मला काम मिळाले ना, मग आता तुझा त्रास पण कमी होईल आणि माझ्या नाती पण आनंदात राहतील, म्हणुन मला इतका आनंद झाला बघ..' आजी.. मामा... आता बस झाल्या तुमच्या गप्पा, आराम करा आता, मी पण भांडी घासुन घेते.'