श्री दत्त अवतार भाग १२

  • 8.3k
  • 2.6k

श्री दत्त अवतार भाग १२ “बाळ तु कोण आहेस”? त्यांचा हा प्रश्न ऐकून दत्तात्रेय म्हणाले, “ माझे स्वरुप कोणाच्याही प्रतीतीला येणारे नसल्यामूळे मला अप्रतितस्वरुप म्हणतात, मला बाह्यरूपाने किंवा उपाधीने जाणता येत नाही". “तुझा आश्रयदाता कोण आहे ते सांग”? दत्तात्रेय म्हणाले, “ मला कोणी आश्रयदाता नाही व माझा कोणी आश्रय अथवा संरक्षकही नाही.” "तुझे निवासस्थान कोणते आहे?" . "माझ्याकडे निवास नाही व माझे आश्रयदाते गुरुही नाहीत “तुझा योग कोणता व त्याच्या अभ्यासाची रीत कोणती”? दत्तात्रेय म्हणाले “ माझ्या योगाला मी चित्रयोग हे नाव दिलेले असून त्याच्या अभ्यासाची काही प्रक्रिया नाही.” यावर सिध्दांनी विचारले, “तुझा गुरु तरी कोण आहे”? त्यावर दत्तात्रेयांनी उत्तर