सौभाग्य व ती! - 25

  • 6.3k
  • 2.7k

२५) सौभाग्य व ती ! मार्च महिन्यातले भर दुपारचे रखरखते ऊन! सूर्यदेव आपल्या किरणाद्वारे जणू आगीचे लोळ फेकत होते. त्यांचा तो रूद्रावतार सहन होत नव्हता. घरात बसून जनता सूर्याचे ते रूप अनुभवत होती. त्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात होती. थंडावा मिळावा म्हणून कुलर, पंखे अशा गोष्टींचा सहारा घेऊन बचाव करत होती. परंतु ज्यांचे पोट हातावर आहे असे लोक सूर्याला सामोरे जाताना, स्वतःच्याच घामाने शरीराची आग थंड करीत होते. ऊन नको म्हणणारे लोकही कामासाठी बाहेर पडत होते. नयन तिच्या कार्यालयात