सलाम-ए-इश्क़ - भाग -१

  • 14.4k
  • 1
  • 5.2k

महानगर विकास मंडळाचे सभागृह उपस्थितांनी खच्चून भरले होते.प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.’आम्ही पुणेकर–आम्ही उद्योजक’ या संस्थेतर्फे दरवर्षी पुण्यातील नव्याने भरारी घेणाऱ्या १० निवडक तरुण उद्योजकांना देण्यात येणारा- ‘न्यूबीझ’ पुरस्कारचा आज वितरण सोहळा पार पडत होता. पुरस्कार वितरणाला सुरुवात झाली.निमंत्रितांच्या रांगेत बसलेले समस्त शिर्के कुटुंबीय आतुरतेने वाट बघत होते ते त्यांच्या लाडक्या आदित्यच्या नावाची.यंदाच्या १० उद्योजकांच्या यादीमध्ये त्याचे ही नाव होते.त्याचा हा पहिलाच पुरस्कार असल्याने शिर्के कुटुंबीयांचा उर अभिमानाने भरून आला होता.स्वतःची कंपनी असलेल्या संजय शिर्केंचा हा धाकटा मुलगा.मोठा मुलगा अभिमान..... ‘शिर्के इंजिनिरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी वडिलांच्या बरोबरीने सांभाळत होता.संजय शिर्के त्यांची पत्नी विभा,मुलगा अभिमान ,सून ऋतुजा व नातू