तुझसे नाराज नही जिंदगी...

  • 8.9k
  • 2.5k

डिअर जिंदगी.... तुझसे नाराज नही जिंदगी...आलो उल्लंघुनि, दुःखाचे पर्वत!हे तुकोबांनी म्हणल्या प्रमाणे मजुरांनी भान विसरून जीवनावर नाराज न होता व्यवस्थेवर विजय मिळवला.जिवनाशी नाराजी नाहीच. ध्येय गाठयची इच्छाशक्ती असेल तर कसेही गाठता येते. पायात काही नसलं तरीही रस्ता पार करता येतो. अनेक गोष्टी नाहीत म्हणून रस्ता कशाला सोडायचा.रस्ते ,वाहन लॉक झाले तरी इच्छाशक्तीमुळे मजुर हजारो किलोमीटर चालून पोहोचलेच. इच्छाशक्ती लॉक डाऊन न झाल्यामुळेच शक्य झाले. मृत्यू मुळे जगण्याची इच्छा लॉक होऊ शकते, इच्छाशक्ती नाही.अनवाणी पाय खाचखळ ग्याला जुमानत नाहीत.ध्येयाकडे चालणाऱ्या पाया साठी रस्ता स्वर्ग असतो. इच्छाशक्ती दांडगी असेल तर जीवनाविषयी तक्रार राहत नाही. इच्छाशक्तीने मांझीने डोंगरातून रस्ता बनविला. कुठे तक्रार आहे. इच्छाशक्ती पुढे तक्रार