मुलगी होणं सोपं नाही - 4 - बाबांच्या नावाची कमी..

  • 6.8k
  • 1
  • 2.6k

संध्याकाळी सात वाजायला आले होते, मी अणि माई वाटेकडे डोळे लावुन बसलो होतो. तेवढ्यात समोरून ताई आणि आजी येताना दिसल्या.. त्यांना दोघींना बघुन माई धावत घरात गेली आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन आली. चिऊ, "काय गं अशी दरवाजात बसलेस??"काही नाही गं आजी, मी आणि माई तुमचीच वाट बघत होतो.माई आजीला पाणी देत, "हो ना.. सात वाजत आले आजी, तरीही तुमचा पत्ता नाही.. म्हणुन आम्हांला काळजी वाटत होती."अगं माझ्या चिमुकल्यांनो मला रोजच ऊशिर होत राहील.. ताई तु लवकर येत जा गं.. तु नको इतका वेळ थांबु बाहेर.."चालेल आजी ऊद्या पासुन मी लवकरच जाईल आणि लवकरच येईल."जा.. तुम्ही दोघी हात पाय धुवुन घ्या..