कादंबरी- जिवलगा ...भाग-४६ वा

  • 11.9k
  • 2
  • 5.6k

कादंबरी – जिवलगा भाग- ४६ वा ----------------------------------------------------------------------------------- शनिवारची सकाळ ..नेहा ,सोनिया आणि अनिता ..तिघींचा सुटीचा आणि आळशीपणाचा दिवस ,सगळा टाईमटेबल अगदी संथपणाने चालणारा . घाई नाही..गडबड नाही... पण आजचा शनिवार वेगळा होता.. नेहमी सारखा सुट्टीचा दिवस म्हणून कसे ही वागून चालणारे नव्हते . सोनियाचे पाहुणे ..दोन वडीलधारी माणसे घरात आहेत ..त्यांच्या समोर हे असले वागणे बरे दिसत नाही..चला उठा ..! असे म्हणत ..नेहाने ..सोनिया आणि अनिता दोघींना नेहमीपेक्षा खूप लौकर उठवले ..आणि घर आवरून ठेवायला ,नीटनेटके ठेवायला मदत करा असे सांगत कामाला लावले. मुकाट्याने दोघी उठल्या .. या वेळी मनात नेहाचा कितीही राग आला तरी त्याचा उपयोग नव्हता . मधुरिमादीदी