कोरोना व्हायरस नशिबाला दोष देवू नका

  • 8.2k
  • 2.6k

3. कोरोना व्हायरस नशिबाला दोष देवू नका कोरोना व्हायरस आला आहे आणि या ना त्या प्रकारे सत्यानाश करुन राहिला असून आपल्याला सावध राहाणे गरजेचे आहे. हा व्हायरस वूहानसारख्या शहरातून शेकडो किमीचा प्रवास करुन भारतात आला आहे. या व्हायरसची दहशतच माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. जागतिक क्रमवारीचा विचार केल्यास लोकं पाखरासारखे मरत आहेत. लोकांना सावरायलाही जागा नाही. कारण या व्हायरसवर निदान करण्यासाठी लस अजूनही प्राप्त झाली नाही. त्रेतायुगात रामाला ज्यावेळी कैकयीने वनवास दिला. त्यावेळी लक्ष्मण कैकेयीला दोष देत होता. पण रामानं म्हटलं, हे लक्ष्मणा, माता कैकेयीला दोष देवू नकोस. कारण वनवास होणं हे विधीलिखीत होतं. तो वनवास आपल्या नशिबात होता. द्वापरयुगात