4. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे कोणतेही काम करीत असतांना एक श्लोक नेहमी आठवतो, त्या श्लोकात रामदास स्वामी म्हणतात. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. बरोबर आहे. कोणतेही काम केल्याशिवाय फळ मिळत नाही. आम्ही काम करतो. नव्हे तर आम्हास ती कामे करावीच लागतात. अगदी बालवयापासून. पण काही काही लोकं अशीे असतात की त्यांना कामंच करायला आवडत नाही. कारण त्यांना कंटाळा येत असतो. काही काही लोकं मात्र भाग्यवानही असतात. त्यांना वाडवडीलोपार्जीत कमविलेल्या संपत्तीने त्यांना कामाला जावेच लागत नाही. नव्हे तर जास्त काम करावे लागत नाही. कारण त्यांच्या हाताखाली नोकर असतात. ते आळशी नसतात काही अपवाद सोडले तर. श्रम