गुंतता हृदय हे!! (भाग १२)

  • 7.8k
  • 1
  • 3.2k

समीर गौरीला म्हणाला, "कुठे गेली होतीस? मी किती टेन्शन मध्ये आलेलो माहीत आहे तुला..फोन का बंद ठेवला होतास? खूप वेळ बेल वाजवून पण जेव्हा तू दरवाजा उघडला नाहीस, तेव्हा मनात नको नको ते विचार आले..तुला काही झालं असतं तर मी काय करणार होतो..मी नाही राहू शकत गं तुझ्याशिवाय गौरी..मी रात्रभर खूप विचार केला आणि आज सकाळी तुला हो बोलायचं असं ठरविलं..पण जेव्हा तू दरवाजा नाही उघडलास आणि तुझा फोन ही बंद आला तेव्हा.." असे म्हणून तो क्षणभर थांबला आणि तो त्याच्या गुढघ्यांवर बसला व त्याने गौरीचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, "मी माझे पाहिले प्रेम कधीच नाही विसरू शकत..पण