मुलगी होणं सोपं नाही - 5 - मामाचे लग्न...

  • 6.9k
  • 2.6k

ताईसोबत ते काही तास कसे गेले मला कळलेच नाही. आज पहिल्यांदा मी संपुर्ण गाव बघत होती. मला फिरायला मज्जा ही येत होती आणि मी फिरुन दमली सुद्धा होती. ताईसोबत गजले विकता विकता, सहा केव्हा वाजले ते समजले सुद्धा नाही. "ताई आपल्याला आता घरी जावं लागेल.. ""का गं..? दमलीस का काय तु???"मी नाही दमली गं, "पण माई आली असेल ना आता शाळेतुन घरी..""हो गं.. चल इथुनच मागे जाऊ आपण .."आम्ही गावाच्या वेशीवरुन मागे वळणार तेवढ्यात आजी आम्हांला धडकली... काय गं चिऊ? तु काय करते ताईसोबत??"मी ताई सोबत गजरे विकायला आले .. "हो मग आता तु पण गिव फिरणार का? काय गं ताई