पावसातली ती ...

  • 3.6k
  • 1.2k

रविवार चा दिवस होता... दुपारचे साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता. आभाळ काळ्या कुट्ट ढगांनी भरून आले होते .. मातीचा मस्त सुगंध येत होता .. सगळी धरती हिरवी-गार झाली होती, झाड मुक्त होऊन वाहणाऱ्या वाऱ्या बरोबर डोलत होती. घरात बसूनही कंटाळा आला होता, मी गाडी काढली आणि बाहेर चक्कर मारण्यासाठी निघालो ...कुठ जावा काही सुचत नव्हत मग मी नदी काठी जाण्याचा निर्णय घेतला .. नदी ही घरा पासून ५ ते ६ किलोमिटर अंतरावर होती .. वातावरण खूपचं भारी झालं होत . थंड गार हवा चालू होती त्यामुळं गाडी चालवायला मज्जा येत होती.. नदी जवळ येतात. .. पावसाची