गुंतता हृदय हे!! (भाग १३)

  • 7.1k
  • 3.2k

आर्या आणि अनिशचे लग्न २ महिन्यांनी ठरलं..दोघांच्याही घरातले खूप खुश होते..जोशी काकू आणि गोडबोले काकू दोघीही लग्नाच्या तयारीला लागल्या.. जोंशी काकूंना सर्व तयारी आर्याच्या पसंतीनेच करायची होती..खरेदी, दागिने, भेटवस्तू, मानपान!!!..बापरे!! किती गोष्टींची तयारी करायची होती.. त्यांना लग्नात कसलीच कसर सोडायची नव्हती..त्यांच्या लाडक्या आर्याचे जे लग्न होते.. गोडबोले काकूंचे ही तसेच होते..पण त्यांना दगदग होऊ नये म्हणून अनिश आणि त्याच्या बाबांनी सगळ्या लग्नाच्या तयारीची जवाबदारी स्वतःवर घेतली होती.. सर्व धावपळ जरी ते दोघे करीत असले तरी काकूंच्या सल्ल्यानुसार सगळे चालले होते.. काकूंना अनिशचे लग्न खूपच धामधुमीत करायचे होते..पण त्याच्या ह्या अचानक च्या आजारामुळे अनिशला हे लग्न अगदी साधेपणाने आटपायचे होते.. पण