स्वरूप - एका शेफचा प्रवास

  • 8.5k
  • 2.4k

मुलांचं स्वयंपाक करणं म्हणजे जरा विचित्रच. अस पूर्वी वाटायचं. पण याला एक कुटूंब अपवाद होत ते म्हणजे शेफ स्वरूप याच. ही कथा आहे स्वरूपची त्याच्या प्रवासाची. स्वप्न सगळेच बघतात कुणाची पूर्ण होतात तर कुणी नशिबाला दोष देत बसतात. स्वरूप मात्र जिद्दी होता. ते म्हणतात न 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' अगदी तसच लहानपणा पासुन स्वरूपला आपल्या आईला किचनमध्ये मदत करण्याची आवड होती. कुठलही काम असो स्वरूप अगदी बारकाईने लक्ष देऊन पाहायचा आणि करण्याचा प्रयत्न देखील करायचा अगदी भाजी निवडण्या पासुन ते फोडणी देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत अगदी आवडीने रस घ्यायचा स्वरूपला फक्त स्वयपाकाचीच आवड न्हवती तर तो अभ्यासात देखील तितकाच हुशार होता.