सौभाग्य व ती! - 33

  • 4.6k
  • 2k

३३) सौभाग्य व ती ! आसवांवर कुणाचेही नियंत्रण नसते. कारण ते स्थळ, काळ, वेळ, प्रसंग इत्यादी गोष्टींचे भान न ठेवता डोळ्यांमध्ये दाटी करतात. अश्रुंनी मात्र नयनला अहोरात्र साथ दिली होती. चांगल्या-वाईट कोणत्याही प्रसंगी ते नयनच्या सोबत असत. तितक्या चांगल्या, आनंदाच्यावेळी कौतुक करायला आसवं उपस्थित होतेच. त्या आसवांमध्ये त्यागाचे, सफलतेचे, कर्तव्यपूर्तीचे अनेक भावाचे मिश्रण होते. तो दिवस अत्यंत धावपळीत, आनंदात गेला. आशा, मीराही त्यात सहभागी झाल्यामुळे सर्वांना वेगळेच समाधान लाभले. चार केव्हा वाजले ते कुणालाच कळाले नाही. बरोबर पाच वाजता नयन, बाळू, मीना, मीरा, आशा सारे सभास्थळी पोहोचले. स्टेडियम अगोदरच माणसांनी फुलले होते. खांडरे साहेब आणि इतर प्रतिष्ठित पोहचायला वेळ होता.