३४) सौभाग्य व ती ! माधवीच्या लग्नाची तयारी सुरू झाली. वर्तमानपत्रातून भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर मालकाने भाऊंना नोकरीहून कमी केलं होतं. तेव्हापासून भाऊ अत्यंत निराश होते. मूकदर्शक बनून घरातील प्रत्येक हालचाल न्याहाळत असत. लग्नाच्या बाबतीत ते चकार शब्द बोलत नसत. नयनची आई जमेल तसं निवडण्याचे काम करीत होती. मीरा-माधव, आशा मधुकर मदतीला होतेच. आई-अण्णा अधूनमधून चक्कर टाकत असत. किशोरही काय हवं -नको ते विचारीत असे. किशोर आणि माधवनेही आर्थिक मदतीची तयारी दर्शविली होती. परंतु नयनने नकार दिला. सर्व पाहुण्यांची