सलाम-ए-इश्क़ - भाग-८

  • 8k
  • 3.2k

आशुच्या चेहऱ्यावर पसरलेल लाजेच चांदण त्या भर उन्हातही चमकत होत...म्हणूनच की काय शलाकानेही तिला काही विचारायचं टाळलं आणि ते निघाले. ‘आशुडे तू सॉरी बोललीस की नाही आमच्या इत्यादीला? ‘ohh my god….look at you baby…you are blushing………….’ ‘जाडे बास ना आता...........चल जाते मी घरी उद्यापासून दुसरा विषय घेऊ अभ्यासाला.’ शलाकाला एक चापट मारत ती निघाली. रात्री कितीही प्रयत्न केला तरी आशुचे डोळे लागत नव्हते आणि तिकडे स्वप्नशिल्पमध्ये ही परिस्थिती वेगळी नव्हती. खिडकीतून दिसणारी चंद्रकोर तिलाच गालातल्या गालात हसतेय असं जाणवून तिकडे एकटक बघत ती डोळ्यांनीच त्या चंद्रालाच जणू जाब विचारात होती- ‘बघ तो तुझ्यापासून दूर आहे पण मला दिसतोय की इतक्या