प्रारब्ध भाग १

  • 12.5k
  • 7.2k

प्रारब्ध ..भाग १ आज सकाळी सकाळीच किसनरावांचे आणि सखुबाई चे घर सजलेले होते . संपूर्ण परिसर झाडलेला ,दारात शेणसडा टाकून रंगीत रांगोळी घातलेली . अंगणात एका बाजूस असलेल्या तुळशीची पूजा करून तिच्यापुढे उदबत्ती लावली होती . एका कोपर्यात एका लहान टेबलवर तांब्या आणि दोन चार भांडी ठेवली होती . टेबलाजवळ घरातल्या दोन चार प्लास्टिक खुर्च्या ठेवल्या होत्या,शेजारीच दोन सतरंज्या घातल्या होत्या . जवळच एका पिशवीत हार ,फुले इतर साहित्य होते . नुकतेच गावातले सनईवाले येऊन दाखल झाले होते . कार्यक्रम घरगुती होता पण ५० /१०० उंबरा असलेल्या त्या लहान गावात प्रत्येक जण एकमेकाच्या जवळचा होता त्यामुळे कार्यक्रमाला न बोलावता