कोरानाच्या माध्यमातून जग प्रदुषणमुक्त होईल

  • 8.3k
  • 2.3k

10. कोरानाच्या माध्यमातून जग प्रदुषणमुक्त होईल देशात खुप मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढलेलं होतं. ध्वनीप्रदुषण, वायूप्रदुषण, पाणीप्रदुषण, त्याचबरोबर मनप्रदुषणही. त्यामुळं कुठं ध्वनीतून आजार, कुठं श्वसनातून आजार, तर कुठं थुंकण्यातून आजार निर्माण होत होते. कुठं मनप्रदुषणातून चो-या, डकैती, खुन, फसवेगीरीही...... प्रदुषणानं कहर माजवला होता. त्यामुळं पृथ्वीच्या आवरणावर त्याचा परीणाम झाला होता. पृथ्वीवरील रहिवाशी लोकांवरही. महत्वाचं म्हणजे प्रदुषणाचे जे प्रकार आहेत. त्यात वाढ झाली होती. आवरणाचे तीन प्रकार आहेत. वातावरण, जलावरण, शिलावरण. या तीनही आवरणात प्रदुषण आहे. कारखान्यात वाढ झाली. त्या कारखान्यातून निघणारा जो धूर होता. त्या धुरातून सल्फर डाय आक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड निघून व वातावरणात पोहचून वातावरण विषारी झाले. तसेच त्याच