कोरोना व्हायरस शाळेचा प्रश्न

  • 8.6k
  • 2.2k

11. कोरोना व्हायरस;शाळेचा प्रश्न कोरोना व्हायरस लोकांना छळत चाललाय. सरकारन लाकडाऊन करुन पाहिलं. पण काही उपयोग झाला नाही. काही काही लोकांनी तर लाकडाऊन जबरदस्तीनं तोडलं. लोकं महिनाभर घरात राहिल्यानं उपासमार होवू लागली. त्यातच आंदोलनंही. कारण लोकं त्रासले होते. म्हणून सरकारनं लाकडाऊन खोलायचं ठरवलं. लोकं ऐकत नाहीत. म्हणून सरकारनं लाकडाऊन उघडायचं ठरवल्यावर लोकं आनंदित झाले. त्यांना आता कोरोनाचं भय राहिलं नाही. त्यातच आता उपासानं मरण्यापेक्षा कोरोनानं मरु अशी हिंमत लोकांनी आपल्या मनात निर्माण केली. तसेच प्रतिकारशक्ती ही. पण खरंच कोरोना लोकांच्या हिमतीला ऐकतो काय? मग काय, लाकडाऊन उघडताच कोरोनाला मोकळे रान भेटले आणि देशात तीव्र गतीने कोरोना वाढायला लागला. नागपुरचं उदाहरण