12. कोरोना व्हायरस;ऑनलाईन शिक्षण कोरोना व्हायरस आला आणि सर्वच क्षेत्र बहुतःश निकामी झालं. मग ते व्यापारी क्षेत्र असो की अजून कोणते. त्यानं कोणत्याच क्षेत्राला सोडलं नाही. अजुनही काही दुकानं उघडलेली नाहीत. आणि काही प्रतिबंधीत क्षेत्र खुली झाली नाहीत. हे तर इतर क्षेत्रातील झालं. शिक्षण क्षेत्रातही शिक्षणाचा बोरा वाजलेला दिसत आहे. सरकार म्हणत आहे की कोरोना अजुनही आटोक्यात आलेला नसून आम्ही या कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवू. योजना बरी आहे. बरोबरही आहे. कारण आजच्या काळात सर्वांजवळ स्मार्टफोन आहेत. त्यांचे फोन ऑनलाईन नेटवर असतात. पण हे जरी वरवर खरं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हे खरं नाही. कारण अजुनही ब-याच लोकांजवळ व्हाट्सअपचे मोबाईल नाहीत.