कादंबरी- जिवलगा ...भाग -४९ वा

  • 12.8k
  • 6.8k

कादंबरी जिवलगा भाग – ४९ वा --------------------------------------------- १. --------------- शैलेश आणि वीरू हे पुन्हा आपल्या आयुष्यात येतील ..याची कल्पना सोनियाने कधी केली नव्हती. त्यांच्या एकत्र येण्याची शक्यता अजिबात नव्हती . त्यामुळे परस्परसंमतीने वेगळे होण्याच्या दृष्टीने सगळी कारवाई सुरु होती ..आणि लवकरच त्यांचा डायव्होर्स अर्ज मंजूर होण्यापर्यंतची कार्यवाही पूर्ण झाली होती , आणि आता हे अचानक .. अपघाताच्या निमिताने नियतीने पुन्हा जवळ आणून ठेवले होते , जिच्यासाठी शैलेश आपल्याला सोडून देण्याची भाषा करीत होता ..तिनेच ऐनवेळी ..आधाराच्या वेळी ..शैलेशची साथ सोडली .., खरी जाणीव ,खरे प्रेम .म्हणजे नेमके काय ? .हे तिला उमजले असेल का ? म्हणूनच काही सबंध नाही..तशी