कादंबरी - प्रेमाची जादू - भाग-१६ वा

  • 6.8k
  • 3.1k

कादंबरी – प्रेमाची जादू -२. भाग- १६ वा ------------------------------------------ कादंबरी –प्रेमाची जादू भाग-१६ वा ------------------------------------------- पहिल्या दिवसाची काम ..ठीक सात वाजता संपवून ..मधुरा यशच्या केबिन मध्ये आली , मी बाहेर बसलेल्या माझ्या मेनेजर साहेबांना विचारले आहे ..कामाचे स्वरूप ..आणि त्या प्रेमाने आजचे काम संपले ..तू जाऊ शकतेस ,असे सांगितल्यावर मी निघाले आहे . मधुराकडे पाहत यश म्हणाला – ओके ,ठीक आहे ,उद्यापासून मात्र .तू मला रिपोर्ट करण्याची गरज नाहीये , ऑफिस –स्टाफ हा डायरेक्ट मेनेजर –काकांच्या कंट्रोल मध्ये आहे..तू त्यांना रिपोर्ट करीत जा . मी नेहमीच माझ्या केबिन मध्ये असतोच असे नाही , बाहेरची कामे करण्यात माझा वेळ जातो .