प्रारब्ध भाग ३

  • 9.1k
  • 4.9k

प्रारब्ध भाग ३ यानंतर आलेले सर्व लोक नवरा नवरीला भेटायला येऊन त्यांना आहेर ,शुभेच्छा देऊ लागले . परेशचे मित्र,गावातल्या सुमनच्या मैत्रिणी ,मिनू ही सगळी दोघांची मस्करी करू लागली. आलेल्या लोकांच्या एकमेकात गप्पा गोष्टी ,हास्यविनोद सुरु झाले . इकडे जेवणाची पण गडबड सुरु झाली . शेजारीच असलेल्या सोसायटीच्या हॉलमध्ये जेवायला टेबल खुर्च्या लावल्या होत्या . तालुक्याच्या गावातुन नेहेमीचे आचारी आले होते . गावातले दीडएकशे लोक जेवायला होते . शिवाय परेशच्या गावातले पण पन्नासभर लोक बोलावले होतेच . लोकांच्या पंगती बसु लागल्या . जिलेबी,मठ्ठा,मसालेभात हा बेत होता सोबत भजी ,पुऱ्या, कुर्मा असे पदार्थ होते . परेशच्या मामा मामींनी लग्नाचा अगदी थाटमाट केला