सलाम-ए-इश्क़ -  भाग - ११

  • 8.6k
  • 3.7k

कालचा कार्यक्रम,त्यानिमित्ताने झालेली धावपळ यामुळे आदिला जाग आली तेव्हा सकाळचे ९ वाजून गेले होते. ऑफिसला जायला उशीर होणार म्हणून तो स्वतःवर चिडला आणि त्याने आवरायला घेतलं. ‘आका तुला माहित आहे आजीमॉम माझ्यासाठी एक न्यू काकी आणणार आहे...........’ “डॅडी ! मी आत्ताच आलोय ना..मला आकाला न्यू काकीबद्द्ल सांगायचंय ….माझा फ्रेंड ओम आहे ना त्याची काकी त्याला डान्स,ड्रॉईंग शिकवते ..तर न्यू काकी पण मला शिकवेल का हे विचारायचंय...आणि ती मला .....” खुर्चीला हळूहळू हेलकावे देत अगस्त्य बोलत होता तसं त्याला अलगद उचलून खाली ठेवत अभिमान म्हणाला-“अगस्त्य चल पळ बाळा आजीमॉम ओरडेल नाहीतर” म्हणून त्याने अगस्त्यला खाली पिटाळलं आणि दरवाजा लाऊन घेतला. आदीच्या