प्रारब्ध भाग ५

  • 8.7k
  • 1
  • 4k

बस पुण्यात पोचली तेव्हा परेशने सुमनला जागे केले . ती दचकून उठली ..”अग दचकु नकोस अशी ,उठ पुणे आलेय जेवायचे आहे न ? भुक लागली की नाही ..? सुमनने स्वतःला सावरून साडी नीट केली आणि केसावरून हात फिरवून आपली लांब वेणी पुढे ओढुन घेतली आणि उठून उभी राहिली . मग दोघे मिळून बसमधून खाली उतरले. ते एक बऱ्यापैकी हॉटेल होते इथे अर्धा तास जेवण करण्यासाठी बस थांबणार होती . टेबल वर बसल्यावर वेटरला परेशने जेवणाची थाळी सांगितली ,सुमनला विचारल्यावर ती डोसा खाते म्हणाली तिच्यासाठी परेशने पेपर डोसा सांगितला . सुमनने हॉटेल असे पहिल्यांदा पाहिले होते ,तिला ते खुप छान वाटले