जोडी तुझी माझी - भाग 2

(17)
  • 22.6k
  • 15.3k

गौरवी आता शुद्धीवर आली होती आणि आपण हॉस्पिटल मध्ये कसे? कोणी आणलं इथे? म्हणून नर्स ला विचारात होती. तेवढयात विवेक औषधी घेऊन तिथे आला. आणि गौरवीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. विवेक - " मी आणलं तुला इथे, कस वाटतंय तुला आता?" गौरवी त्याच्याकडे फक्त बघत होती. वरून शांत दिसत असली तरी खूप राग , प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालत होते. विवेक - (तिला भानावर आणत) काय झालं? असं का बघतेय? मी काही केलंय का? आणि तू कुठे होतीस? तो खर तर परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता की हिला काही समजलंय का ते. नर्स तिथे समोर असल्यामुळे ती फारस काही