सलाम-ए-इश्क़ - भाग - १२

(11)
  • 7.8k
  • 3.5k

भाग-१२ “All India NGO Conference and Exhibition” चा पहिला दिवस उद्घाटन आणि अध्यक्षीय भाषणं यातच गेला.The Social Engineering Pvt. Ltd.चा स्टॉल अगदी मोक्याच्या जागेवर होता. प्रमुख पाहुणे भेट देणार म्हणून पहिल्या दिवशी स्टॉलवर अमित सोबत आदित्यही जातीने हजर राहिला. नंतरचे दोन दिवस ठरल्याप्रमाणे बाकीचे स्टाफ मेंबर असणार होते. दुसऱ्या दिवशी नची आणि पिहू कंपनीला चांगल्याप्रकारे रिप्रेझेंट करत होते. त्यांच्या प्रोडक्टची बऱ्यापैकी इन्क्वायरी वाढत होती.सकाळपासून व्हिजिटर्सचा राबता असल्याने त्यांची दमछाक झाली होती. दुपारी लंचब्रेक नंतर ते जरा निवांत बसून गप्पा मारत होते.समोरचा स्टॉल जो सकाळच्या सेशन पर्यंत रिकामा होता त्याठिकाणी व्हॅलेंटिअर्स टीम स्टोलची अरेंजमेंट करत होती. शेजारी एक वयस्क महिला आणि