प्रारब्ध भाग ७

  • 5.9k
  • 2.9k

प्रारब्ध भाग ७ रात्री खुप उशिरा झोपून सुद्धा ... सकाळी नेहेमीप्रमाणे साडेपाच वाजता परेशला जाग आली . रोजच्या रुटीनमध्ये त्याला रोज सकाळी आठ वाजता बाहेर पडायला लागत असे . घरापासून दोन तास लोकल प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी पोचायचे असे . पुर्वी तो घराजवळच असलेल्या कंपनीत होता . पण जेव्हा प्रमोशन मिळाले तेव्हा त्याची कंपनीच्या दुसऱ्या युनिटला बदली झाली होती . जाग आल्यावर त्याने शेजारी पाहिले तर सुमन गाढ झोपेत होती . तिचे लांब मुलायम केस तिच्या अंगावर आणि उशीभर पसरले होते . तिच्या लांब लांब पापण्या झोपेत तिच्या गालावर विसावल्या होत्या . तिचा गोरापान बांधेसूद देह ,गुलाबी रसदार ओठ ..