सलाम-ए-इश्क़ - अंतिम भाग

(31)
  • 8.7k
  • 1
  • 3.6k

पाण्याचा एक घोट घेत शांतपणे तिने बोलायला सुरुवात केली- “शले...तुला आणि आदिला चिठ्ठी लिहून मी माझ्या घरी काय प्रॉब्लेम झाला हे सांगितलंच होत आणि तुम्हाला हा ही विश्वास दिला होता की माझं लग्न होतंय पण माझ्या मनात भलताच प्लान होता,आत्महत्या......हे शरीर,हा आत्मा...माझं असलेलं आणि नसलेलं अस्तित्व फक्त नि फक्त माझ्या आदीच होतं. मी ठरवलं स्वतःला विहिरीत जाणूनबुजून झोकून द्यायचं. ते कसं अमलात आणायचं हे ही ठरवलं...त्या दिवशी मी आरतीच ताट घेऊन विहिरीकडे निघाले होते तोच पंकजने,माझ्या चुलत भावाने मध्येच थांबवलं,तो म्हणाला भाऊजींना म्हणजे विक्रम जाधव,माझ्या चुलत आत्याचा मुलगा,माझा होणारा नवरा..त्याला बोलायचंय म्हणे महत्वाचं. दुसऱ्या दिवशी लग्न म्हणजे त्याला जावायचा मान मिळायला सुरवात झाली